शिरूर तालुका

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या बांधापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही तोपर्यंत चळवळ शांत बसणार नाही असे पवळे यांनी सांगितले. तसेच ऍड. सुप्रिया साकोरे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. विजय शेलार यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व रस्त्याचे महत्त्व पटवून दिले.

सरदवाडी हे गाव रोड मॉडेल व्हिलेज म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच लक्ष्मी जाधव यांनी सांगितले.

तसेच रोड मॉडेल व्हिलेज कमिटी स्थापन करण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे शरद भाऊ पवळे, विजय शेलार, ऍड. सुप्रिया साकोरे, सुरेश वाळके, बापूराव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिरामण सरोदे, उपाध्यक्ष कैलास सरोदे,उपसरपंच सोमनाथ सरोदे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे,शिल्पा घावटे,विद्या सरोदे, सुरेखा निरवणे, मोनाली कर्डिले ग्रामस्तरीय कमिटीचे पंकज शेळके, विकास सोसायटीचे संचालक किशोर सरोदे, शिरूर मंडलाधिकारी फलके साहेब, तलाठी चौधरी मॅडम, माजी सरपंच कमलताई सरोदे, हनुमान सरोदे आदी ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदवाडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी केले तर आभार सरपंच लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

19 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago