शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन मध्ये सध्या उन्हाळ्यातून होणाऱ्या उकाड्यापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांकडून कुलर भेट देण्यात आल्याने शिक्रापूरच्या पोलिसांना पोलिस पाटलांकडून गारवा मिळाला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन मध्ये आज पोलीस पाटील यांची मिटिंग आयोजित करण्यात आलेली असताना काही पोलीस कर्मचारी काम करत असलेल्या ठिकाणी उन्हाचा कडाका जास्त असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना उकाड्यात काम करण्याची वेळ येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांच्याकडून पोलीस स्टेशनला कुलर भेट देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस हवालदार संदीप कारंडे, शिरुर तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष प्रकाश करपे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, कृष्णा गजरे, लक्ष्मण खैरे, आत्माराम डफळ, जालिंदर पवार, मंगेश चव्हाण, पांडुरंग दरेकर यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना पोलीस पाटील यांच्याकडून पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेला सदर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले, दरम्यान पोलीस हवालदार संदीप कारंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…