शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पायी घरी चाललेले असताना पाठीमागून दोन युवक आले त्यांनी राम यांना शिवीगाळ दमदाटी करत त्यांच्या खिशातील महागडा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर मोबाईल चोरी करून दोघे निघून गेले.
घडलेल्या घटनेबाबत राम पाटलोबा होळंबे (वय ४४) रा. वढू बुद्रुक (ता. शिरूर) जि. पुणे, मुळ रा. होळंब ता. परळी वैजनाथ जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…