शिक्रापूर (शेरखानशेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर हॉटेल अजिंक्यातारा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत गोविंद संग्राम पवार या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर असलेल्या अजिंक्यतारा हॉटेल समोरुन गोविंद पवार हे रस्ता ओलांडत असताना पुणे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची गोविंद यांना जोरात धडक बसून अपघात झाला. यावेळी गोविंद हा रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र उपचारा दरम्यान गोविद संग्राम पवार (वय ३६) रा. जकातेवस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कमलवाडी ता. देवणी जि. लातूर याचा मृत्यू झाला असून याबाबत सुदर्शन बापूराव बिरादार (वय ४६) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. तांबरवाडी ता. निलंगा जि. लातूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…