शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे 60 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास कवठे येमाई गावातील शेतजमीन गट नं. ६३१ मध्ये दत्तात्रय पोखरकर यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये कापणीला आलेले १ एकर गव्हाचे पिक कापुन मळणीसाठी त्याच्या पेंढया बांधुन एका जागेवर जमा करून ठेवल्या होत्या.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याचे उद्देशाने त्या गव्हाच्या जमा करून ठेवलेल्या पेंढया पेटवुन देवुन त्यांच्या गव्हाचे सुमारे ६०,०००/- रू. चे नुकसान केले आहे म्हणून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…