शिरूर तालुका

शिक्रापूरच्या राऊतवाडीत बिबट्याचा वासरावर हल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासरावर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील सदाशिव राऊत हे त्यांची जनावरे गोठ्यात बांधून झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून कुत्रे भुंकण्याचा व गाय ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील लोकांनी गोठ्यात पाहिले असता एक बिबट्या वासरावर हल्ला करत असल्याचे दिसले.

दरम्यान पुनम राऊत, किरण राऊत, देविदास राऊत, सिध्दार्थ कोल्हे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील शेतात पळून गेला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे. यावेळी वनविभागाचे अधिकारी व पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वासराची पाहणी केली असून सदर वासराची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तर परिसरात वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत तर वनविभागाने सदर परिसरात कार्यवाही करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व नागरिक करत आहे.

याबाबत शिरुर वनविभागाचे वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदर परिसराची पाहणी करुन पुढील कार्यकाही केली जाईल असे वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

7 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

7 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

8 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

13 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

13 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

13 तास ago