शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी विवेकानंद फंड यांची सन 2023 ते 2026 या कार्यकाळासाठी निवड करण्यात आली.
पुणे जिल्हा ग्रंथालय संघाची बिनविरोध निवडणूक शिक्षक भवन येथे नुकतीच पार पडली यावेळी सर्वानुमते रांजणगाव गणपती (ता. शिरुर)येथील विवेकानंद फंड यांना तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य संशोधन परिषदेचे अध्यक्ष विजय कोलते, कार्यवाह सोपानराव पवार, ग्रंथमित्र धों.स.सुतार गुरुजी, रमेश सुतार, हमीद तांबोळी, तुकाराम रासकर , निवडणूक निर्णय अधिकारी विजय हांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच हया निवडणूक कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील ग्रंथालय संघाचे सभासद, चळवळीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिरुर तालुक्यातील ग्रंथालयांना मार्गदर्शन करण्याबरोबर गाव तेथे ग्रंथालय योजना पोहोचवणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील ग्रंथालयांना मिळवून देणार असल्याची भावना विवेकानंद फंड यांनी यावेळी
आपल्या मनोगतात व्यक्त केली.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…
नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…
शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…
मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…
मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…