क्राईम

पिस्तुल घेऊन अभिवादनास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापूर पोलिसांनी पिस्तुल जप्त करत केला गुन्हा दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शासनाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेली असताना देखील पिस्तुल घेऊन आलेल्या भीमराव आसाराम खंदारे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत पिस्तुल जप्त केला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना परिसरात शस्त्रे, लाठी, काठी, तलवारी, पिस्तुल अशा वस्तून घेऊन येण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातलेली असताना देखील जयस्तंभ अभिवादन साठी आलेला एक व्यक्ती पार्किंग मध्ये पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार अमोल दांडगे, विकास पाटील यांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेत पाहणी केली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल व त्यामध्ये पाच राउंड मिळून आले.

दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता सदर पिस्तुल हे परवाना धारक असून बंदी असताना देखील त्या इसमाने जवळ बाळगले असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश माळी रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भीमराव आसाराम खंदारे (वय ६२) रा. डोंबिवली ओमसाई सोसायटी जि. ठाणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत सदर पिस्तुल जप्त केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’; एकनाथ शिंदे

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…

4 मिनिटे ago

‘राजकीय वळण’ असल्याचा आरोप म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न; धनंजय शिंदे यांची टीका

मुंबई: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘राजकीय वळण’ लागल्याचा आरोप करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांना बगल देण्याचा…

19 मिनिटे ago

दुष्काळाच्या संकटामुळे राष्ट्रवादीचे २७ सप्टेंबरचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले; सुनेत्रा पवार यांचा निर्णय

१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका मुंबई : राज्यातील…

14 तास ago

दुष्काळाच्या संकटातून बळीराजाची सुटका कर, शेतशिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे; सुनेत्रा पवार

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री…

14 तास ago

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जा; सुनेत्रा पवारांचे पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार…

14 तास ago

राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेला मोठी चालना; १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; एकनाथ शिंदेंक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार…

14 तास ago