शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या गोडावूनच्या खिडकीचे गज वाकवून गोडावून मधील सव्वा 2 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील अल्टो इंजिनीअरिंग कंपनीच्या गोडावून मधून बनवल्या जाणाऱ्या जॉब साठी कंपनीने काही कच्चा माल आणून कंपनीच्या गोडावून मध्ये आणून ठेवलेला होता. 4 मार्च रोजी सर्वजन गोडावून बंद करुन घरी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळच्या सुमारास कामगार गोडावून मध्ये आले असता त्यांना दरवाजा तुटलेला तसेच तेथील काही साहित्य गायब असल्याचे दिसले. त्यांनी याबाबतची माहिती कंपनीचे मालक संजय पवार यांना दिली.
दरम्यान संजय पवार यांनी पोलिसांना महिती देत कंपनीच्या गोडावून मध्ये आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक प्रताप कांबळे, पोलीस शिपाई लखन शिरसकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत येथील सीसीटीव्हीची पाहणी केली असता गोडावूनच्या खिडकीचे गज तोडून दोघांनी आतमध्ये येथून कंपनीतील तब्बल 2 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.
याबाबत संजय नाना पवार (वय ४७) रा. वाघोली ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…