शिरूर तालुका

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने बाप लेकीची भेट

टाकळी भिमातून गेलेली अल्पवयीन बालिका पालकांच्या स्वाधीन

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथून अल्पवयीन अकरा वर्षीय बालिका बेपत्ता झालेली असताना सदर बालिका शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने पालकांच्या स्वाधीन गेली असून बापलेकांची भेट घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक करत पोलिसांचा सन्मान केला आहे.

टाकळी भीमा (ता. शिरुर) चांदणी यादव हि 11 वर्षीय बालिका 1 मार्च रोजी गावात दळण आणण्यासाठी गेली मात्र उशीर झाल्याने वडील रागवतील या भीतीने ती गावातून निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी देखील चांदणीचा तपास न लागल्याने चांदणीचे वडील संदीप बनारसी यादव (वय ३२) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दाखल केली.

सदर घटनेबाबत शिक्रापूर पोलीस या बालिकेचा शोध घेत असताना चांदणी हि तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार यांना मिळाली. त्यानंतर विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांनी सदर ठिकाणी जात गणेश लवांडे या युवकाच्या मदतीने बालिकेला शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आणून तिच्या वडिलांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले दरम्यान आपल्या मुलीला पाहून तिच्या वडिलांना गहिवरुन आले.

बालिकेचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाल्याने टाकळी भीमा ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील प्रकाश करपे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास कुंभार, मयूर कुंभार, अमोल नलगे यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान पोलीस आमच्या साठी देवदूत असल्याची भावना चांदणीचे वडील संदीप यादव यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago