शिरूर तालुका

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल

कोळगाव डोळस येथील प्रकार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि. २२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ (वय ४५) ता. शिरूर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगाव डोळस येथील शाळेत शिक्षक बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ हा अध्यापनाचे काम करीत आहे. तो चौथीत शिकणाऱ्या मुलींना वर्ग झाडून काढण्यास तसेच इतर कामे सांगत असे. मुली वर्ग झाडत असताना तो त्यांच्याशी गैरकृत्य करीत होता, असे प्रकार त्याने अनेक वेळा केले आहेत. तो मुलीला पट्ट्याने मारण्याची व जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे सदर पीडित मुलगी शाळेत जाण्यास घाबरत होती. पालकांनी विश्वासात घेत विचारपूस केल्याने तीने सर्व प्रकार सांगितला आहे. यामुळे संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकत शिक्षकाला चोप दिला. तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असुन चौकशी अंती निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले. पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

15 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

22 तास ago