शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने गाडी नंबर वरुन चालकाचा शोध
शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या युवकाचा महागडा मोबाईल एका वाहन चालकाने उचलून नेलेला असताना शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने चक्क काही तासात सदर मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये राम सूर्यवंशी हा युवक चहा पिण्यासाठी आलेले असताना त्याने त्याचा आयफोन मोबाईल टेबल वर ठेवलेला असताना एका ट्रक चालकाने तो मोबाईल उचलून नेला होता, त्यांनतर हॉटेल चालक किशोर हिवाळे यांनी सीसीटीव्हीची तपासणी करत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई उद्धव भालेराव यांना माहिती देत ट्रकचा नंबर सांगितला असता उद्धव भालेराव व महेंद्र पाटील यांनी ट्रक नंबरवरुन ट्रकच्या मालकाचा मोबाईल नंबर काढून चालकाचा नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क करत घडलेला प्रकार सांगून मोबाईल आणून देण्याची विनंती केली.
गोंधळून गेलेल्या ट्रक चालकाने पुन्हा रांजणगाव गणपती येथून शिक्रापूर येथे येत हॉटेल मधून उचलून नेलेला मोबाईल पोलिसांकडे देत पोलिसांसह मोबाईल मालक व हॉटेल चालकाची देखील माफी मागितली. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते मोबाईल राम सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला तर यावेळी बोलताना मोबाईल चोरीला गेल्यानंतर अपेक्षा सोडावी लागते. मात्र आपला मोबाईल पोलिसांमुळे परत मिळाला असल्याचे सांगत राम सूर्यवंशी यांनी पोलिसांचे आभार मानले.
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…