शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवत मागितली खंडणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे येथे एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून गावामध्ये सुखरुप राहण्यासाठी खंडणीची मागणी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीराम मंदिर समोरून सोहम दरेकर हा युवक जात असताना केतन दरेकर, यश दरेकर व व्यंकटेश चांदोले यांनी सोहमला अडवून गावामध्ये कोयत्याचा धाक दाखवून सुखरुप राहायचे असेल तर पैसे दे अशी मागणी केली. दरम्यान सोहम याने पैसे देण्यास नकार दिला असता तिघांनी सोहम याला शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गज व काठीने मारहाण करुन जखमी करत जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली.

घडलेल्या प्रकाराबाबत सोहम अरुण दरेकर (वय १७) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले तिघे रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

14 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago