शिरूर तालुका

धामारीत मुलाच्या उसन्या पैशावरुन आई वडिलांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे मुलाला दिलेल्या उसन्या पैशाच्या वादातून मुलाच्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश चांगदेव पावसे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील अक्षय शेळके याने गावातील गणेश पावसे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते, त्यांनतर गणेश हा अक्षयच्या घरी गेला आणि अक्षयच्या आई अनिता यांना पैसे मागितले. त्यावेळी अक्षयची आई त्याला म्हणाली अक्षयने पैसे घेतले हे मला आत्ता समजले असे सांगितले असता गणेश याने अनिता यांना मारहाण केली. त्यानंतर घराचे बाहेर असलेल्या अक्षयच्या वडिलांना देखील मारहाण केली.

याबाबत अनिता शंकर शेळके (वय ४०) रा. धामारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश चांगदेव पावसे (वय ३५) रा. पावसे वस्ती धामारी (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago