शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून वाहनाची वाट पाहत असताना दुचाकीहून आलेल्या तिघांनी त्याला पकडून मारहाण करत त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेत दुचाकीहून पळून गेल्याची घटना घडली.
याबाबत कृष्णा शेषराव पवार (वय २५) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बांधगाव टाकळी ता. नांदगाव जि. नाशिक याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…