रांजणगांव गणपती (तेजस फडके): “मी अत्यंत गरिब कुटुंबातुन जन्म घेतला आहे. जिद्द,चिकाटी,कष्ट मेहनत करुन माझ्या वडिलांनी आम्हा चार भावांना शिक्षण देऊन घडविले आहे. त्यामुळे गरिबाची अवस्था काय असते याची मला पुर्णपणे जाणीव आहे. कामगारांच्या विविध अडीअडचणी,त्यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी, कामगारांच्या न्यायहक्कासाठी मी जनता दलाच्या माध्यमातुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन नाथाभाऊ शेवाळे यांनी केले.
शिरुर तालुक्यातील कारेगांव येथील भुमीपुञ नाथाभाऊ शेवाळे यांची जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन जनरल कामगार युनियनच्या वतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते अॅड डॉ. अरुण जाधव, रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे मार्गदर्शक पञकार रिजवान बागवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष मनोज जगताप, शाखा अध्यक्ष विनोद जगताप, रिपब्लिकन जनरल कामगार युनियनचे कारेगांव शाखा अध्यक्ष कैलास वेताळ, उपाध्यक्ष विजय चव्हाण, कार्याध्यक्ष जितेंद्र विरघट, अनिल जाधव, अनिल कांबळे व पदाधिकारी तसेच कामगार युनियनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते डॉ. अरुण जाधव, युनियनचे मार्गदर्शक पत्रकार रिजवान बागवान यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज जगताप तर आभार युनियनचे शाखा अध्यक्ष कैलास वेताळ यांनी मानले.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…
शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…
मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…
नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…
मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…