शिरूर तालुका

प्रमोद क्षिरसागर शिक्रापूरचे नवे पोलीस निरीक्षक

प्रमोद क्षिरसागर यांनी स्वीकारला शिक्रापूर ठाण्याचा पदभार

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या असताना प्रमोद क्षिरसागर यांची शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली असून शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी महिन्यात बदल्या होणार असल्याचे बोलले जात असताना नुकतेच पोलीस स्टेशनचा 2 वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांसह काही इतर अधिकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या तर 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जाहीर केलेल्या असताना आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षिरसागर यांची शिक्रापूर येथे नेमणूक करण्यात आली आहे.

नव्याने नेमणूक झालेले अधिकारी त्यांचे ठिकाणी व बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार आर्थिक गुन्हे शाखा ते इंदापूर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक नारायण विनायक पवार यवत पोलीस स्टेशन ते जुन्नर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक हेमंत गणपत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन ते यवत पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक राजकुमार बालाजी केंद्रे आर्थिक गुन्हे शाखा ते खेड पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक विकास अहिलप्पा जाधव जुन्नर पोलीस स्टेशन ते जिल्हा विशेष शाखा, पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षिरसागर आळेफाटा पोलीस स्टेशन ते शिक्रापूर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे सुरक्षा शाखा पुणे ते आळेफाटा पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक संतोष दिनकर जाधव नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा पुणे, महिला पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील नियंत्रण कक्ष ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पुणे, पोलीस निरीक्षक विजयसिंह भगवानसिंह चौहान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पुणे ते डायल ११२ विभाग पुणे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोमलसिंग राउळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ते उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा कार्यालय, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हिरालाल करंडे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा कार्यालय ते लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन विठ्ठलराव कांडगे सायबर पोलीस स्टेशन ते ओतूर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चंद्रकांत शेलार नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन संतराम काळे स्थानिक गुन्हे शाखा ते वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या सह पोलीस निरीक्षक प्रभाकर माधव राव मोरे बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील दौंड पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम नारायण साळुंके यांची वालचंदनगर पोलीस स्टेशन या अधिकाऱ्यांची सध्याच्या नेमणूक ठिकाणी कायमस्वरुपी नेमणूक करण्यात आली आहे.

अशा प्रकारे पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आलेल्या असून प्रत्येकाने तातडीने नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले असून शिक्रापूर पोलीस स्टेशनचा पदभार देखील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या कडून स्वीकारला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

14 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

18 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

18 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

18 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

18 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

18 तास ago