शिरूर तालुका

कान्हूरच्या विद्याधामचा चित्रकला स्पर्धेत झेंडा

चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत तेवीस विद्यार्थी अ श्रेणीत

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने इंटरमिजिएट परीक्षेत मिळविलेल्या यशानंतर नुकतेच जाहीर झालेल्या चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून या परीक्षेत विद्यालयाचे तब्बल 23 विद्यार्थी अ श्रेणीत तर 12 विद्यार्थी ब श्रेणीत आणि 2 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व कलाशिक्षक दीपक मोरे यांनी दिली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चित्रकला एलेमेंटरी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून विद्यालयातील आर्यन गाजरे, अतिष बोऱ्हाडे, वीरेंद्र पिंगळे, ईश्वर पिंगळे, सोहम नाणेकर, आर्यन नाणेकर, प्रवीण गायकवाड, अथर्व ननावरे, मयूर ढगे, सुजित थोपटे, आयुष दंडवते, सार्थक तळोले, सोहम धुमाळ, पायल उकिर्डे, सिद्धी ढगे, तनुजा पुंडे, ज्ञानेश्वरी पुंडे, वैष्णवी खैरे, चैताली दाते, संचिता नरवडे, गौरी ढगे, सोहम मोरे, अथर्व नाणेकर या विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर समाधान भोसले, सार्थक खैरे, श्रेयश खैरे, प्रज्ज्वल धुमाळ, सिद्धी नाणेकर, गीता पुंडे, सिद्धी राक्षे, साक्षी खैरे, दीपाली वाघोले, अनुजा नाणेकर, आदित्य खैरे, मयूर पुंडे यांनी तसेच समीक्षा गोरडे, कुणाल भोर या दोघांनी क श्रेणीत यश संपादित केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दीपक मोरे यांनी मार्गदर्शन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य अनिल शिंदे तसेच विद्या विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

12 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

12 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago