शिरूर तालुका

बाभुळसर खुर्द येथील श्रावणी वाळकेची नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आसानसोल (पश्चिम बंगाल) येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या जी व्ही माळवनकर शूटिंग चॅम्पमियनशिप स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्रावणी संतोष वाळके हिने दहा मीटर पिपसाईड एअर रायफल या प्रकारात 400 पैकी 372 गुणांची कमाई केली असुन या कामगिरीमुळे तिची 1 ते 9 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे होणाऱ्या 65 व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

श्रावणीचे वडील हे शेतकरी असुन श्रावणी हि कारेगाव येथील कारेश्वर इंग्लिश स्कूल येथे इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत आहे. शिरुर मधील युनिक शूटिंग स्पोर्ट् क्लब मध्ये ती शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या यशाबद्दल श्रावणीवर कौतुकाचा वर्षाव होत असुन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाभुळसर खुर्द च्या गावच्या सरपंच सोनाली फंड, उपसरपंच शेखर डाळिंबकर तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले असुन आगामी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

4 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

5 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago