शिरूर तालुका

शिक्रापुरात अमृत महोत्सव निमित्त रॅली सह वृक्षारोपण

रॅलीमध्ये माजी सैनिकांसह, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी सहभागी

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने माजी सैनिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करत माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तिरंगा रॅलीचे आयोजन करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, पूजा भुजबळ, शालन राऊत, मोहिनी मांढरे, उषा राऊत, पोलीस हवालदार किशोर तेलंग, संदीप कारंडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, उपाध्यक्ष संभाजी मांढरे, सचिव निलेश राऊत, संजय नरके, सोमनाथ भुजबळ, बाळासाहेब चव्हाण, दिलीप कोठावळे, प्रकाश चव्हाण, सतीश सासवडे, लद्धाराम पटेल, राजेंद्र मांढरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, प्रीतम राऊत, माजी सैनिक सुदाम भुजबळ, अर्जुन भुजबळ, जालिंदर ढमढेरे, मोहन सासवडे, विठ्ठल जगताप, रामदास भुजबळ, विकास भुजबळ, जयसिंग गायकवाड, पोपट होले, सुरेश ढमढेरे, श्रीरंग ढमढेरे यांसह आदी मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माजी सानिकांच्या उपस्थितीत गावातून प्रभात फेरी काढत भैरवनाथ मंदिर येथे माजी सैनिक व पोलिसांच्या हस्ते वृक्षारोपण करत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कोठावळे यांनी केले तर सरपंच रमेश गडदे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी…

8 मिनिटे ago

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

2 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

2 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

2 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

2 तास ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

2 तास ago