शिरूर तालुका

शिरूर मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याकडून अधिकृतरित्याच बॅनर पोस्टर होर्डिंग लावण्याचे आवाहन

शिरूर( अरुणकुमार मोटे): उच्च न्यायालय मुंबई यांचे PIL. १५५ अंतर्गत दि. १८/११/२०२४ रोजीच्या निर्देशानुसार शहराचे विद्रुपीकरण करण्यात येईल अश्या प्रकारचे बेकायदा,अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावण्यास शहरात उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांची घटना समितीचे अध्यक्ष शिरुर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे PIL. 155 अंतर्गत माहिती घटना समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी प्रितम पाटील व उपाध्यक्ष तथा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,शिरूर पोलिस स्टेशन व सर्व पक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार, नागरिक, प्रिंटिंग प्रेस प्रमुख, मंडप उभारणी करणाऱ्या व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये बेकायदा,अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लाऊन शहराचे विद्रुपीकरण करण्यात येईल अशा बेकायदा अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग शहरात उभारण्यास पूर्ण बंदी करण्यात आलेली आहे. तरी शिरूर नगरपरिषद कार्यालयाकडून विहित परवानगी घेतल्यानंतरच असे अधिकृत पोस्टर, बॅनर लावण्यात यावेत व सदर परवानगीची मुदत संपल्यानंतर संबंधित व्यक्तीने जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग त्वरित काढून घेण्यात यावे. अन्यथा न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे बेकायदा,अनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग तत्काळ जप्त करून सदर इसमाकडून दंड वसूल केला जाईल व फौजदारी कारवाई प्रक्रिया करण्यात येईल.

त्यानुसार घटना समितीद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावण्यासंबंधी असेल तर शिरूर नगरपरिषद कार्यालयाकडून पोस्टर, बॅनर लावण्यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसाठीची ठिकाणे- पाबळ फाटा एम.एस.ई.बी भिंतीला लागून, बी जे कॉर्नर पी.डब्ल्यू.डी जवळील यांच्या भिंतीला लागून, राष्ट्रीय महामार्ग रस्ता संमुख बस स्टँड समोरील भिंतीला लागून, नगरपरिषद शाळा क्र.४ व ६ समोरील रयत मैदान भिंतीच्या कडेला लागून, कृषी उत्पन्न बाजार समिति समोरील शिरूर नगरपरिषदेची मोकळी जागा सर्वे नं.११३३ अ/अ३,पोस्ट ऑफिस भिंतीच्या कडेला, पंचायत समितीच्या सुरक्षा भिंतीच्या कडेला लागून आमरधम कडे जाणारा रस्ता, निर्माण प्लाझा समोरील कोर्टच्या भिंतीला लागून, १७ कमानी जवळ पांजर पोळ ते वेदांत हॉस्पिटल ३० मीटर रोडची रुंदी सोडून रस्त्याच्या कडेला, महाजन मळा उजव्या बाजूस,अग्निशामक इमारतीच्या आजूबाजूला, बी.एस.एन.एल इमारतीच्या आजूबाजूला अश्या प्रकारची ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. तसेच दर व विहित कार्यपद्धती निर्धारित करणेत आलेली असून याबाबत अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी म्हणुन पंकज राजेंद्र काकड, रचना सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच तक्रार निवारणकरिता टोल फ्री क्र. १८००२३३२१२३, SMS व Whatsapp no. ८०८००५५२०६ व वेबसाईट:- https://mahaulb.in/MahaULB/index नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी कोणत्याही नागरिकांनी बेकायदाअनधिकृत जाहिराती, पोस्टर, बॅनर, होर्डिंग लाऊन शहराचे विद्रुपीकरण करू नये, अशी विनंती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी नागरिकांना केली आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

5 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

5 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

5 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

5 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

8 तास ago