मुख्य बातम्या

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

शिरुर (तेजस फडके) करडे (ता. शिरुर) येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत माजी सैनिक राहुल वाळके यांच्या पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेत त्यांना कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याने रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे दि २७ जानेवारी २०२५ रोजी चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. परंतु फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी अजुनही मोकाट फिरत आहेत.

 

माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आधी शिरुरचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांची भेट घेत फरार आरोपीना तातडीने अटक करावी अन्यथा माजी सैनिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही पोलिसांनी काहीच हालचाल न केल्याने माजी सैनिकांनी शुक्रवार दि ३१ जानेवारी २०२५ रोजी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांची भेट घेतली.

 

त्यानंतर आमदार कटके यांनी शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याशी संपर्क साधत संबंधित घटनेत दोषी असणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर ढोले यांनी आरोपीना तातडीने अटक करु अस आश्वासन दिले होते. परंतु अजुनही आरोपी फरारच आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन ६ दिवस उलटुनही आरोपीना अटक करण्यात आली नसल्याने शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

देशसेवा केलेल्या माजी सैंनिकांना मिळेना न्याय; तर सर्वसामान्य लोकांची अवस्था काय…? 

शिरुर तालुक्यात शिरुर, रांजणगाव आणि शिक्रापुर या तीनही पोलिस स्टेशन हद्दीत अनेक गुन्ह्यांचा तपास पेंडिंग असुन सर्वसामान्य लोकांना सतत पोलिस स्टेशनला हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेकवेळा फिर्यादीला आपण तक्रार का केली…? याचा पश्चाताप होत असुन त्याला पोलिसांकडुन संबंधितावर कारवाई करण्याऐवजी आज या उद्या या असे कारण सांगत फक्त ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्यामुळे सर्वसामान्य लोक पोलिसांकडे जाण्याचे टाळत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. देशसेवा केलेले माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नीची आर्थिक फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी देऊन सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी सुद्धा जर आरोपी फरार होऊन मोकाट फिरत असतील तर ‘कुछ तो गडबड है’ अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

 

करडे येथील माजी सैनिक यांच्या पत्नीच्या आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला असुन तपासही योग्य पद्धतीने चालु आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याचे पुरावे तपासुन आरोपीना अटक करावी याबाबत शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनाही योग्य त्या सुचना दिलेल्या आहेत.

प्रशांत ढोले (DYSP) 

उपविभागीय अधिकारी, शिरुर 

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

शिक्रापुरचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांची दंबग कामगिरी, दोन स्कॉर्पिओ सह ५३ किलो गांजा केला जप्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर…

3 तास ago

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

3 तास ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

3 तास ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

4 तास ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

6 तास ago