atul-kohakade
शिरूर: शिरूर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल बाबासाहेब कोहकडे (वय ४६) यांचे हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
शिरूर शहरामध्ये अतुल कोहकडे यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे अनेकांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले होते. शिवाय, शिरूर शहरातील व्यापारी वर्गासोबत त्यांचे चांगले संबंध होते.
अतुल कोहकडे यांना मंगळवारी (ता. १) सकाळी बागेमध्ये चालत असताना छातीमध्ये त्रास होऊ लागला होता. घरी आल्यानंतर थोडा आराम केल्यानंतर बरे वाटू लागले होते. पण, काही वेळानंतर घरामध्येच ते कोसळले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. अतुल कोहकडे यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. व्यापारी वर्गासह मित्र परिवारातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…
रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…