स्टेरॉईडचा वापर टाळा…
संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे डोळे लाल होणे आणि सूज येणे यावर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड याचा वापर केला जातो. शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा, खाज सुटणे यासह वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर डोळ्यांच्या आजारासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, नागरिकांनी स्टेरॉईडचा वापर करू नयेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण दीर्घकाळ वापरल्याने याचे डोळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
डोळे येण्याची लक्षणे
डोळे लाल होणे. वारंवार पाणी गळणे. डोळयाना सुज येणे. काही वेळा डोळयातुन चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजुस येतो. डोळयाला खाज येते. डोळे जड वाटतात व डोळयात काहीतरी गेल्यासारखे वाटते.
डोळे आल्यास अशी काळजी घ्या…
डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसु नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. घराबाहेर जाताना गॉगल वापरा. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा. डॉक्टाराच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी. डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…