शिरूर तालुका

शिरुरला श्रीराम सेनेच्या शिवजयंती मिरवणुकीतील देखाव्याचे आकर्षण

शिरुर (तेजस फडके) अयोध्येच्या राममंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या प्रभू श्री रामाची प्रतिकृती आणि त्यापुढे महाबली हनुमानाची मूर्ती तर अग्रस्थानी शिवरायांचा पुतळा… रोषणाईने उजळलेला देखावा आणि आतषबाजी हे चित्र पहावयास मिळाले शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यानजीक श्रीराम सेनेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी शिरुर बाजार समितीच्या आवारात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला वैभव जोशी महाराज यांच्या पौरोहित्यात अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते आरती आणि शिववंदना झाली.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, युवा नेते अमोल चव्हाण, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, अनिल पवार, संतोष काळे उपस्थित होते. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची मूर्ती, महिरप उभारली होती. फुलांची सजावटही करण्यात आली होती. याच रथावर हनुमानाची मूर्तीही साकारली होती. मिरवणुकीत असंख्य तरुण भगवे झेंडे नाचवीत सहभागी झाले होते.

 

शिरुर शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीवर भगवी कागदी फुले, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. यावेळी खिदमत फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, शहराध्यक्ष शरद कालेवार मिरवणुकीत सहभागी झाले होते. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव, उत्सव प्रमुख संपत दसगुडे, युवासेनेचे शहर प्रमुख स्वप्नील रेड्डी, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, भाजपचे शहर सरचिटणीस अविनाश जाधव, बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश शेळके, सागर नरवडे, सूरज काळे, महेंद्र येवले, सिद्धांत चव्हाण, तेजस गायकवाड, रणजित गायकवाड, रूपेश घाडगे, सुनील जठार, आकाश चौरे, रूद्र राखुंडे, यश धन्त्री, योगेश महाजन, आकाश क्षीरसागर, आदींनी या मिरवणुकीचे संयोजन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

3 दिवस ago