कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील गणेगाव खालसा येथील शेतावर काम करणाऱ्या मजुराने मालकाची गाडी चोरुन होती. याबाबत दुचाकी मालकाने पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती. रांजणगाव पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला छत्रपती संभाजीनगर येथुन अटक करत त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याचे मुळगाव (नांदुरा इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) येथुन जप्त केली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेगाव दुमाला (ता. शिरुर) येथील शेतकरी गणेश सिताराम बडदे यांची होंडा कंपनीची MH 12 SR 9010 हि शाईन मोटार सायकल शेतावरील कामगाराने चोरुन नेली होती. याबाबत सदर कामगार दिलीप ऊर्फ दलित संजय पठाडे (वय 28) रा. नांदुरा इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ याच्याविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये 13 मार्च 20124 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास अधिकारी संदीप जगदाळे यांना चोरी गेलेली दुचाकी व आरोपीचा तपास करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस हवालदार संदीप जगदाळे आणि विजय सरजिने यांनी खबऱ्यामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने चोरीला गेलेल्या दुचाकी तसेच आरोपीचा शोध घेत असताना आरोपी दिलीप पठाडे याला छत्रपती संभाजीनगर येथील समर्थनगर येथे दि 23 मार्च 2024 रोजी अटक केली.
त्यानंतर त्याच्याकडे चोरलेल्या दुचाकीबाबत अधिक तपास केला असता. त्याने ती दुचाकी त्याच्या मुळगावी (नांदुरा इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे लपवुन ठेवली असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथकाने चोरीला गेलेली 40 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची शाईन दुचाकी (MH 12 SR 9010) दि 27 मार्च 2024 रोजी जप्त केली.
त्यानंतर सदर आरोपीकडे दुचाकी चोरीबाबत अधिक तपास करत असताना तो पुसद ग्रामीण पोलिस स्टेशन (जि. यवतमाळ) येथील बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये मागील दोन वर्षांपासुन फरार असल्याचे निष्पन्न झाल्याने याबाबत पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनला आरोपीला अटक केल्याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करत चोरीला गेलेली दुचाकी मुळ मालक गणेश सिताराम बडदे (रा. गणेगाव खालसा, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या ताब्यात देण्यात आली.त्यामुळे रांजणगाव MIDC पोलिसांनी दाखविलेल्या यां कार्यतत्परतेमुळे सगळीकडुन पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस हवालदार संदीप जगदाळे, विजय सरजिने, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांनी केली असुन आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार संदीप जगदाळे करत आहेत.
रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक
शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…
शिरुरमधील ‘त्या’ युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास…
रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…