शिरूर तालुका

कोरेगावच्या श्रद्धा पाटीलचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वराज्य महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी श्रद्धा हिरालाल पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रद्धा हिरालाल पाटील हिने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिरुर शिक्षण विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. श्रद्धाला वर्गशिक्षक सुरेश सातपुते व मुख्याध्यापक कुसुम बांदल यांनी मार्गदर्शन केले.

सदर स्पर्धा कोंढापुरी येथील सिंहगड इंस्टीट्युट येथे संपन्न झाल्या असून सदर चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व रमेश जाधव यांनी काम पाहिले. यावेळी श्रद्धा पाटील हिने इयत्ता तिसरी ते पाचवी ग गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्रद्धाच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, उपाध्यक्ष दमयंती कांचन यांसह आदींनी अभिनंदन करत पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago