शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची मागणी करत असतात. मात्र शिरुर तालुक्यातील खैरेनगर येथील ग्रामपंचायत इमारतच धोकादायक झाल्याची घटना समोर आली असून इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
खैरेनगर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या सदर इमारत जीर्ण व धोकेदायक झाली असून सदर इमारतीचा स्लॅब उघडा पडला आहे. खैरेनगर ग्रामपंचायतीला नवीन इमारत मिळावी यासाठी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला असल्याची माहिती सरपंच संदीप खैरे, उपसरपंच सतीश खैरे यांसह ग्रामविकास अधिकारी मनीषा पुंडे यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना १९८३ साली सदर इमारत लोड बेरिंग पद्धतीत बांधण्यात आलेली असून या इमारतीला सध्या ३९ वर्षे पूर्ण झाल्याने इमारतीतील स्लॅबचे स्टील उघडे पडून छताचे प्लॅस्टर खाली कोसळते. छतावर पाणी साठल्यामुळे गळती होत आहे. ग्रामपंचायत इमारत जीर्ण झाल्यामुळे नवीन ग्रामपंचायत इमारत मिळावा यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडे पत्र व्यवहार करुन पाठपुरावा सुरु केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी करत स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे सांगत प्रशासनाने नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सरपंच खैरे यांनी केली आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…