शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान होते. रांजणगाव परिसरातील नातेवाईक, ग्रामस्थ यांनी दत्तात्रय जाधव यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पाठिमागे त्यांची पत्नी, २ मुले, आई-वडील, भाऊ, सुन, बहिण, असा परिवार आहे. शिरुर लोकसभा भा ज पा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हर्षद जाधव हे त्यांचे पुत्र होत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

शिक्रापूर: शिक्रापूरचे (ता. शिरूर) माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात यांनी विहिरीमध्ये…

5 मि. ago

कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने…

13 तास ago

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत…

14 तास ago

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

2 दिवस ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

2 दिवस ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

3 दिवस ago