कोरेगाव भीमा पेरणे येथील घटना
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): हवेली (ता. पेरणे) कोरेगाव भीमा आणि पेरणे गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात आज (दि. १९) सकाळच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहत येताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नदीत मृतदेह तरंगताना दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ याची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची बातमी वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरली असून मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे पुणे-अहमदनगर महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचे व मृतदेह ताब्यात घेण्याचे दुहेरी आव्हान कुशलतेने हाताळले असुन सध्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण व इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…
२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…
मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…
हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…
मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…
पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…