महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांच सरकार कशामुळ कोसळल; विजय वडेट्टीवार

मुंबई: एकनाथ शिंदे यांचं सरकार कशा पद्धतीने आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी माहिती आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे ‘काल हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे असंही ते म्हणाले.

कुणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण शिंदेंचं जे सरकार आलं, जी काही सत्तापालट झाली, ती सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे’, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. ‘जे काही अधिकारी आहेत. आजी – माजी मंत्री आहेत. यात खूप बड्या व्यक्तींचा समावेश आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही असंही ते म्हणाले.

जेव्हा दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल. तिकीट लावूनच चित्र दाखवावं लागेल’, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. वडेट्टीवारांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचेच नेते नाना पटोले यांनी काल विधानसभेत हनी ट्र्रॅपचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसं काही घडलं नसल्याचं सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

2 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

4 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

4 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

4 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

7 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

16 तास ago