तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर महामार्गाला जोडला जाणाऱ्या (L&T) एल अँड टी फाटा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ‘लोकांचा जीव गेल्यावर रस्त्यावरचे खड्डे भरणार आहात का…?’ असा मजकुर लिहिलेले बरेचसे फलक (Banner) या रस्त्यावर विविध ठिकाणी लावण्यात आले असुन हे फलक (Banner) सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
तळेगाव ढमढेरे ते (L&T) एल अँड टी फाटा रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता अशा आशयाचे फलक (Banner) लावलेले आहेत. परंतु या संदर्भात अधिक माहिती घेतली असता हे फलक (Banner) कोणी लावले आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले आहेत. सरकार चालत आहे. पण रस्त्यांची देखभाल होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित नागरिकांना त्रास होणार नाही. तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी (L&T) फाटा या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. हा तीन किलोमीटर अंतर असणारा रस्ता जागोजागी पुर्ण उखडल्याने प्रवाशांना व स्थानिक नागरीकांना नाहक त्रास करावा लागत आहे.
प्रत्येक गावात रस्त्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण केले जाते. परंतु काही वर्षांनंतर या रस्त्यावर खड्डे पडतात व त्यांची दुरुस्ती लवकर केली जात नाही. त्यामुळे बरेचसे अपघात घडतात. गेल्या एक वर्षापासून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) ला वेळोवेळी याबाबत कल्पना देऊनही याकडे लक्ष दिले जात नाही असे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणचे शाखा अभियंता जगताप यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
हे फलक (Banner) लावले आहेत ते योग्यच केले आहे. कारण गेली अनेक दिवसापासून या रस्त्यावर खुप मोठे खड्डे पडलेले आहेत. रोज ये-जा करण्यासाठी आम्हाला याच रस्त्याचा वापर करावा लागतो. दुचाकी आणि चारचाकी कार जोरात या खड्ड्यांमध्ये आदळते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असुन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी हीच संबंधित विभागाकडे मागणी आहे.
अक्षय ढमढेरे (स्थानिक नागरिक)
तळेगाव ढमढेरे
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…