शिरूर तालुका

मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय?

महसूलमंत्री विखे पाटलांच्या भेटीने चर्चेला उधान

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असताना ते काही दिवस कारागृहात होते मात्र सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसून यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली तर सध्या नुकतीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली असल्याने मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके चालले तरी काय अशी चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात रंगली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले होते. मात्र बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात राहिले नुकतेच ते बाहेर येत त्यांनी कामाला सुरुवात केली परंतु बांदल यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करत पक्षाबाबत भूमिका जाहीर केलेली नाही, बांदल यांचे पुतणे निखील बांदल यांनी यापूर्वी शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट घेतली होती.

बांदल यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली होती सध्या नुकतीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील भेट मंगलदास बांदल यांनी घेतली असून दोघांमध्ये स्वतंत्र चर्चा देखील झाली असल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

बांदल शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राहिले तर त्याबाबत अनेकदा उघड वाच्यता त्यांनी केलेली असताना सध्या अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे व मंगलदास बांदल एका बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अशोक पवार यांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत.

यापूर्वी बांदल यांनी भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवली असून सध्या भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसून बांदल हे लोकसभेची निवडणूक लढवणारच, असे संकेत देत असताना त्यांनी नुकतीच विखे पाटलांची भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके चालले तरी काय, अशी चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात रंगली आहे.

विखे पाटील शिक्रापूर मध्ये आलेले असताना त्यांचा फोन आल्याने आमची भेट झाली असून त्यावेळी शिरुर चे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक पीएमआरडी कडून कशा कारवाया करत आहेत. शाळेच्या मैदानाला कसा विरोध करत आहेत यांसह तालुक्यातील आदी प्रश्नांवर आमची चर्चा झाली असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

बांदल लोकसभेला उभे राहिले तर जागा विकेल; बाबाराजे देशमुख

मंगलदास बांदल यांनी यापूर्वी आमदार, खासदार घडवले असून बांदल स्वतः दिल्लीमध्ये हवेत मंगलदास बांदल यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, तर त्यांच्या साठी माझी जागा विकून खर्च करेल, असे संकेत देखील बाबाराजे देशमुख यांनी शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

1 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago