शिक्रापूर (शेरखान शेख): शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरुर येथे गोठ्याच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावासह वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महेश साहेबराव जगदाळे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे बबन जगदाळे यांच्या गोठ्याच्या विटा पडलेल्या असल्याने बबन सदर विटा गोळा करत असताना महेश सदर ठिकाणी आला. त्यावेळी त्याने बबन याला शिवीगाळ, दमदाटी करत विटेने मारहाण करत जखमी केले. यावेळी महेशचे वडील साहेबराव व पत्नी रेणुका हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता महेश याने त्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी केली.
याबाबत बबन साहेबराव जगदाळे (वय ३५) रा. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी महेश साहेबराव जगदाळे (वय ३२) रा. शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…