शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा
शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला असून आम्ही देखील पुरुषांप्रमाणे कोणत्याही कामात कमी नाही हे यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे आज जागतिक महिला दिनानिमित्ताने महिला दिनाचे आयोजन करत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर आज पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलीस नाईक अपेक्षा तावरे यांनी कारभार पहिला असून त्यांना मदतनीस म्हणून राणी भागवत यांनी काम केले तर बिनतारी संदेशसाठी गिता बराटे यांनी काम पहिले असताना अन्य महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध कामे पाहिली असून या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवसभर पोलीस स्टेशनचे काम पाहिले.
दरम्यान महिला दिनानिमित्त करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, काकासाहेब शेलार यांनी सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला, तर यावेळी बोलताना पोलीस स्टेशन मधील आम्हाला नेमून दिलेले सर्वच काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो.
परंतु महिला दिनानिमित्ताने विशेष कारभार आमच्याकडे देण्यात आलेला असल्यामुळे आम्हाला वेगळाच आनंद मिळाला असल्याचे यावेळी पोलीस ठाणे अपेक्षा तावरे व राणी भागवत यांसह आदी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले असून दिवसभरात आलेल्या सर्व तक्रारी, संदेश, यांसह पोलीस स्टेशनचे कोणते कर्मचारी कोणत्या कामासाठी कोठे रवाना झाले यांसह सर्व बाबींच्या नोंदी देखील चोखपणे नोंदवून ठेवल्या आहेत, तर आलेल्या सर्व नागरिकांसोबत चर्चा करुन यांच्या तक्रारी जाणून घेण्याचे काम यावेळी या कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करत आलेल्या अनेक महिलांनी मोकळ्या मनाने चर्चा केली असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…