महाराष्ट्र

निखील बांदलांनी घेतली पोपटराव गावडेंची भेट

बांदल व गावडेंच्या भेटीने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चाललेले असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील राजकारणातील जादुगार समजल्या जाणाऱ्या मंगलदास बांदल यांचे पुतणे युवा नेते निखील बांदल यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान आले आहे.

शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना सदर घडामोडी घडवण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचा मोठा हात आहे. काही कारणास्तव बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असल्याने तालुक्यातील राजकारण सोपे झालेले होते. नुकतेच मंगलदास बांदल कारागृहातून बाहेर पडून मैदानात देखील उतरले असताना त्यांचा पुतण्या असलेला निखील बांदल त्यांची सावली बनून त्यांच्या सोबत आहे. सध्या मंगलदास बांदल कोणत्याही पक्षात असल्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप कोणाला समजलेले नसताना राष्ट्रवादीशी त्यांचे काही प्रमाणात वैर असल्याचे उघड आहे.

परंतु शिरुर तालुक्यातील राजकारणातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांची नुकतीच युवा नेते निखील बांदल यांनी भेट घेतली असताना गावडे कुटुंबियांच्या वतीने निखील यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. मात्र त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क बोलले जात असून निखील बांदल व पोपटराव गावडे यांच्यातील भेटीने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेंना उधान आले असून यापुढील काळात शिरुर तालुक्यातील राजकारणात काय घडामोड होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाकळी हाजी भागातून मी जात असताना काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोपटराव गावडे साहेबाची व माझी भेट झाली असून शिरुर तालुक्यातील राजकारणासह दोन वर्षात घडलेल्या विविध घडामोडीबाबत आमची चर्चा झाली असल्याचे याबाबत बोलताना युवा नेते निखील बांदल यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

16 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago