शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर महिंद्रा सुप्रो कारला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात साजिद मुनावर पठाण या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने साजिद पठाण हा युवक त्याच्या ताब्यातील महिंद्रा सुप्रो कार घेऊन चाललेला असताना हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर समोरुन चाकण बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाची पठाणच्या वाहनाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात साजिद मुनावर पठाण (वय २२) रा. पाबळ रस्ता लोणी मावळा जि. अहमदनगर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत उमेश आसाराम महारनवर (वय २३) रा. काळे कॉलनी, काटे वस्ती आळंदी मुळ रा. पावर हाउस जवळ कोतन ता. पाटोदा जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…