शिरूर तालुका

वढू बुद्रुकच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली शिवनेरीची माहिती

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्ती व्हावी या हेतूने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी सहलीचे आयोजन करत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माता पालक समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त सहलीचे नियोजन मार्गदर्शक वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले, माजी उपसरपंच संजय शिवले, शालेय समितीचे अध्यक्ष सर्जेराव शिवले, रेखा शिवले, प्रिया शिवले, संध्या आरगडे, वैशाली शिवले, रोहीणी वायकर, माधुरी पऱ्हाड, कल्याणी भंडारे, नीलम शिवले, जयश्री तनपुरे, आदर्श शिक्षक राजाराम सकट, रवींद्र शिवरकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिवनेरी किल्ला व शिरोली बुद्रूक येथिल विघ्नहर सहकारी साखर कारखाना भेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्त व्हावे हा हेतूने आयोजित सहलीत विद्यार्थ्यांसह शाळेच्या माजी विद्यार्थी व पालकांना देखील सहभागी करण्यात आले होते. यावेळी शिवनेरी किल्ल्याची तटबंदी, भक्कम दरवाजे, बुरुंज, शिवाई देवी मंदिर, राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी शिल्पकृती, छत्रपती शिवाजी महाराज जन्मठिकाण, कडेलोट स्थान, पाणी साठवण्याची सोय, विविध पशू पक्षी, जंगली झाडे, बगीचा, परीसर यांचे मुलांनी निरीक्षण केले. तसेच शिरोली बुद्रुक येथिल विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील मोठी मशिनरी, साखर उत्पादनाची पाहणी करत साखर खाण्याचा आनंद मुलांनी घेतला आणि नंतर अष्टवीनायक पैकी ओझर येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन मुले आनंदाने घरी परतली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago