Categories: इतर

वैष्णवीच्या मामे सासऱ्यांवर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; पोलिस महानिरीक्षक सुपेकरांचा दबाव

अंजली दमानियांचा हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप

पुणे: आयजी जालिंदर सुपेकरांवर 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशीपुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे यांचा त्यांच्या सासरी हुंड्यासाठी छळ झाला होता.या प्रकरणी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार असल्याचे समजते. त्यांना शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आयजी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

वैष्णवीच्या नवऱ्याचे (शशांक हगवणे) ह्यांचे मामा IG जालिंदर सुपेकर ह्यांच्यावर देखील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी जानेवारी २०२५ पासून चालू आहे. वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी (पोलिस महानिरीक्षक) आहेत. त्यांची माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे, एवढेच नाहीतर जळगावमध्ये पीएसआय सादरे जे होते त्यांना, या आयजीनेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, जालिंदर सुपेकर हे पोलिस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत. मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे, तिने पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा, वैष्णवीच्या नणंदेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. म्हणजेच, फरार व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मयुरीच्या आई आणि भावा विरुद्ध एफआयआर करते, आणि पुन्हा गायब होते. तसेच, तू आमचे काहीही बिघडवू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. मला असे वाटते की, हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचे आहे, यामध्ये सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

वैष्णवीचे सगळ्यात ज्यास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली.

अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, वैष्णवीचे सगळ्यात जास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिष्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सुनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळले जायचे. ह्या कुटुंबाला खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे, असे म्हणत अंजली दमानिया यांनी एक फोटीही ट्विट केला आहे. वैष्णवीच्य अंगावरील जखमांपैकी तीन छिद्र असलेली जखम संशयास्पद वाटते. वैष्णवीच्या वडिलांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता, असेही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

16 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

22 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

22 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

23 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

23 तास ago