मध्य प्रदेश: माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती झाली होती. पीडितेच्या पोटदुखीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या गर्भवती असल्याचं उघड झालं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरातमध्ये बलात्कार झाला, असं खोटं सांगण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह मझौली भागात राहते. ४ जुलै रोजी तिच्या पोटात तीव्र वेदना झाल्याने वडिलांनीच तिला जबलपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केलं. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. यानंतर एमटीपी कायद्यानुसार तिचा गर्भपात करण्यात आला.
सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिला. मात्र पोलिसांच्या समजावणुकीनंतर त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये कामाला असताना तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना घडली. यावर पोलिसांनी शून्य क्रमांकाचा गुन्हा दाखल करत प्रकरण गुजरात पोलिसांकडे वर्ग केलं.तथापि, तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेच्या पित्याचा मोबाइल क्रमांक ट्रॅक केला असता उघड झालं की तो गुजरातमध्ये गेला नव्हता, तर मझौलीतच होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पीडित मुलीची अधिक चौकशी केली.
होळीच्या काळात केला अत्याचार
पीडितेने पोलिसांना सांगितलं की, होळीच्या सुमारास तिचे आजोबा मरण पावले होते. त्यामुळे तिची आई आणि बहिण माहेरी गेले होते. त्यावेळी घरात ती, तिचा वडील आणि लहान भाऊ होते. त्याच काळात तिच्या पित्याने तिच्यावर बलात्कार केला.या धक्कादायक खुलास्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला. रुग्णालयातून मिळालेल्या अहवालाच्या आधारे आरोपी पित्याविरोधात पॉक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयाच्या आदेशाने तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…