क्राईम

पुण्यात मित्रमंडळ चौकात भीषण अपघात, तरुणाचा होरपळून मृत्यू

पुणे: पुणे शहरातील मित्रमंडळ चौक परिसरात एका तरुणाचा भीषण अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रस्त्यावर जात असताना केलेल्या चुकीमुळे त्याचा कोळसा झाल्याचे वृत्त आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या ठिकाणी महावितरणचा विद्युत पुरवठा करणारा डीपी बॉक्स आहे, जो सुरक्षेच्या कारणास्तव नेहमी कुलूप लावून बंद ठेवला जातो. मात्र, मृत तरुणाने हा कुलूप तोडून आतल्या उघड्या विद्युत तारांना हात लावला. अत्यंत उच्च दाबाच्या वीज प्रवाहामुळे तरुणाला जोरदार झटका बसला आणि तो आगीत होरपळून जागीच मृत्यू पावला.

सध्या मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस तपास करत असून, त्याने डीपी बॉक्स फोडण्यामागील कारण – चोरी, त्रास किंवा आत्महत्त्या – याबाबतही चौकशी केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री महामार्गावर धुडगूस; शिरुरच्या DB पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत…

18 मिनिटे ago

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

4 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

19 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

19 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

19 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

19 तास ago