क्राईम

मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

कासाबाई ठकाजी शिंदे (रा. शिंदेवाडी, मलठण) या थोरातवाडी भागात मेंढ्याचा कळप चारून सायंकाळी तळावर घेवून जात असताना अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या समोर मेंढ्यावर हल्ला करून ओढत नेल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांचा मुलगा सतीश हा गावात गेला होता. तो आल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने शोध घेतला असता त्यास अर्धवट खाल्लेला मेंढा आढळून आला. अजूनही 3 मेंढ्या त्यांना सापडल्या नसून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.

वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली असून याबाबत सकाळी येवुन पंचनामा करू असे सांगण्यात आल्याचे सतीश शिंदे यांनी सांगितले.

या भागात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवस रात्र बिबट्या संचार सुरू आहे त्यामुळे अनेकदा स्थानिकांना अचानक दर्शन होत आहे. हल्ले वाढल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली असून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ पावले उचलण्याची गरज असून योग्य उपाययोजना न केल्यास 1-2 वर्षातच पशुधना बरोबरच मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

14 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago