शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथून शेतकऱ्याचा ऊस घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही हानी यामध्ये झाली नाही.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रस्त्याने करंदी बाजूने चाकण शिक्रापूर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याने १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एम एच १२ एफ सि ८२५३ हा ट्रक उस घेऊन जात असताना अचानकपणे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याचे कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकून रस्त्याचे कडेला एका घराजवळ उलटला यावेळी चालक सुदैवाने बचावला असून काही वेळाने ज्या कारखान्याकडे ट्रक चाललेला होता त्या कारखान्याच्या व्यक्तींनी सदर ठिकाणी धाव घेत दुसऱ्या ट्रक मधून ऊस कारखान्याकडे पाठवून दिला आहे, मात्र घडलेल्या घटनेत विजेच्या खांबासह ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…