पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या साडीने काल एका कार्यक्रमात पेट घेतला होता, या बातमीने सर्वांची काळजी वाढवली असताना त्यांचे बंधू आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वतःच्या अपघाताची माहिती दिली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रुग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिथेच बंद झाली. अंधार गुडूप. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली. थोडक्यात वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो.
बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती. हार्डीकर डॉक्टर यांना थोडे लागले. मात्र, सर्व सुखरुप आहोत,” असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…