क्राईम

नवले ब्रिजवर एका विचित्र अपघातात तब्बल 48 गाड्यांचे नुकसान…

पुणे: पुण्यातील नवले ब्रिजवर एक विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकदा भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघातग्रस्त टँकर अनियंत्रित झाला आणि त्याने एकामागून एक वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले असल्याचे पोलिस आणि अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

काय घडले नेमके?

पुणे शहरातील कायम व्यस्त असलेल्या नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये 48 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पीएमआरडीए,अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली. गर्दीच्याच वेळी नवले पुलावर ब्रेक निकामी झाल्याने भरधाव आलेल्या टँकरने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यावेळी अपघातात जखमींना नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली.या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

8 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

23 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago