मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा सरकारचा निर्धार असून, त्याला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्ट केले.
नसरापूर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीप लांडे यांच्या पुढाकाराने शिंदे यांची भेट घेऊन आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असून, त्याला शिक्षा होऊनही सुटका झाल्याने त्याची हिंमत वाढली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, या घटनेबाबत त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा केली असून, सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहत आहे. पोलिसांना न्यायवैद्यक व इतर सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करण्याचे आणि लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोपीवर सर्व गंभीर कलमे लावून तो कोणत्याही कारणावरून सुटणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच खटल्यासाठी अनुभवी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, प्रकरणाचा दररोज आढावा घेतला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचाही सरकारचा विचार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “अशा प्रवृत्तींना आळा घालणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.दरम्यान, शिंदे यांनी पीडितेच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांचे सांत्वन केले असून, न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…