महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला.

सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात आली. या पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सांगता सभेत बोलताना सपकाळ यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा व धान यांसारख्या पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नैसर्गिक आणि प्रशासनिक अशा दुहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर आंतरराष्ट्रीय करारांबाबतही गंभीर आरोप केले. या करारांचा विपरीत परिणाम भारतीय शेतीवर होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या आणखी कमकुवत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

इतिहास आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर बोलताना सपकाळ यांनी काही व्यक्तींवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप केला. महाराष्ट्राची परंपरा बदलण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर भाजपने केलेल्या जल्लोषावरही त्यांनी टीका केली. राज्यात शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सुरू असताना जल्लोष करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले.या कार्यक्रमात राहुल बोंद्रे आणि हनुमंत पवार यांनीही भाजप सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची मागणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…

7 मिनिटे ago

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…

12 मिनिटे ago

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…

20 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस; पक्षघटनेतील बदलांवर मागवली महत्त्वाची कागदपत्रे

सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…

23 मिनिटे ago

श्रावणात घरी आणा या 3 पवित्र वस्तू; महादेवांची कृपा, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल अशी मान्यता

वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…

41 मिनिटे ago

सोने-चांदी पुन्हा महागले! आजचे नवीन दर पाहून ग्राहकांना धक्का

मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…

47 मिनिटे ago