क्राईम

स्वातंत्र्यदिनी शाळेत आलेल्या आठवीतील मुलीचे अपहरण; तरुण 24 तासात गजाआड

सोलापूर: स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कराड येथून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत त्या मुलीसह तरुणाला शोधले. सिद्राम बुक्का (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे रहायला असताना संशयित आरोपी सिद्राम याची त्या मुलीशी ओळख झाली होती. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर येथे राहायला गेले होते. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली होती. ११.३० वाजल्यानंतरही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला, मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टॅण्ड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टॅण्डवर चौकशी केली.

दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीने कराडला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार अयाज बागलकोटे, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर, अमोल पवार यांच्या पथकाने पार पाडली.

सिद्रामच्या भावजीचा क्रमांक घेतला अन्‌…

संशयित आरोपी सिद्राम बुक्का याची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. कराडला जाताना वाटेतच पोलिसांनी सिद्रामच्या भावजीचा क्रमांक मिळविला. त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलिस त्याठिकाणी पोचले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी दिसली. पण, सिद्राम बाहेर गेला होता. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्राम यायची वाट पाहिली. तत्पूर्वी, घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते. काहीवेळाने सिद्राम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली. सिद्रामविरुद्ध अपहरणासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

4 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago