पोलिसांच्या सतर्कतेने कार चालक कारसह पोलिसांच्या ताब्यात
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद कर चालकाने एका कारसह दोन दुचाकींना धडक देऊन अपघात झाल्याने तीनन वाहनांचे नुकसान होऊन 2 जण जखमी झाले असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संभाजी हरिभाऊ गायकवाड या कारचालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथे पुणे नगर महामार्गावरुन अनिल औटी हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ जे एच ६८८७ हि कर घेऊन पुणे बाजूकडे चाललेले असताना अहमदनगर बाजूने मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एम एच १२ क्यू डी ००७९ या कर वरील चालकाने औटी यांच्या कारला धडक घेऊन पुढे चाललेल्या एम एच १२ एस टी ७८८१ व एम एच १२ के क्यू ८१०४ या दोन दुचाकींना धडक देऊन भरधाव वेगाने निघून गेला. यावेळी दोन्ही दुचाकीवरील महेंद्रसिंग राजपूत व जयश्री दौंडकर हे दोघे जखमी झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार सहदेव ठुबे, गणेश शेंडे, बापू हदागळे, पोलीस नाईक मिलिंद देवरे, ज्ञानदेव गोरे, ट्राफिक वार्डन अमोल राऊत, अनिल वाडेकर यांनी सदर कार चालकाला चाकण चौक येथे अडवून ताब्यात घेतले असता तो मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले या अपघातात अनिल औटी यांच्या कारसह स्वतः मद्यधुंद कार चालकाच्या कार व दोन दुचाकींचे मोठे नुकसान होऊन महेंद्रसिंग मंगलसिंग राजपूत रा. पाबळ चौक शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे, जयश्री संजय दौंडकर रा. ग्रीनवूड सोसायटी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे हे दोघे किरकोळ जखमी झाले.
याबाबत अनिल भाऊसाहेब औटी (वय ४४) रा. चर्होली ता. हवेली जि. पुणे यांनी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कार चालक संभाजी हरिभाऊ गायकवाड (वय ३२) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…