मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका हॉटेल मध्ये पाच जणांनी बेकायदा जमाव जमवून दोन युवकांना जबरदस्ती रिक्षात बसवुन रांजणगाव औद्योगिक वसाहती (Ranjangaon MIDC) मधील मोकळ्या जागेतील एका कंपनीच्या आवारात नेऊन दोन युवकांना हाताने, लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच कोयते, कुर्‍हाडी, हातात घेऊन हवेत फिरवून आरडाओरड करुन दहशत माजवत एक दुचाकी जाळणाऱ्या पाच जणांविरोधात रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथील बाजारतळात एका हॉटेल मध्ये रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरपुरे, रोहन बोटे, शंकर करंजकर तसेच इतर तीन इसम (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी बेकायदेशीर जमाव जमा करुन फिर्यादी आनंद लक्ष्मण खाडे (वय 19) आणि त्याचा मित्र अक्षय कुठे याला ‘तुला माहित आहे का मी कोन आहे ते…?’ असे म्हणुन जबरदस्तीने त्यांच्याकडे असलेल्या रिक्षा मध्ये बसवत रांजणगाव एमआयडीसी (MIDC) मधील मोकळ्या जागेतील कंपनीच्या आवारात नेऊन फिर्यादी व त्याच्या मित्राला हाताने लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच परिसरामध्ये त्यांनी कोयते, कुर्‍हाडी, हातात घेऊन हवेत फिरवत आरडाओरड करुन दहशत माजवत एमआयडीसी (MIDC) मधील वरद कंपनी जवळ लावलेल्या पाच दुचाकींची तोडफोड करुन त्यापैकी एक दुचाकी जाळून नुकसान केले.

 

त्यामुळे आनंद लक्ष्मण खाडे (वय 19) वर्ष, सध्या रा.कारेगाव, शिवमल्हार बिल्डिंग, ता.शिरुर, जि.पुणे मुळ रा.जामगाव, खाडे वस्ती, ता.पारनेर जि.अहमदनगर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरपुरे, रोहन बोटे, शंकर करंजकर तसेच इतर तीन इसम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे करत आहेत.

शिरुर तालुक्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवदान; तीन जणांवर गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

12 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago